राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

News

चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल केंद्र सरकार, महिती आणि प्रसारण मंत्रालय, तसंच निवड मंडळाच्या सर्व सदस्यांचे अमिताभ बच्चन यांनी आभार मानले.

वर्ष २०१८ साठीचा हा पुरस्कार असून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या वेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमिताभ बच्चन त्या समारंभात सहभागी होऊ शकले नव्हते.

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके यांच्या नावानं दिला जाणारा केंद्र सरकारचा हा पुरस्कार चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान असून दहा लाख रुपये रोख आणि सुवर्ण कमळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. (AIR NEWS)

49 Days ago