A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 75व्या स्मृतिदिनानिमित्त देशाचं अभिवादन

news

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त देशानं आज आज त्यांना आदरांजली वाहिली. देशभरात आज सकाळी अकरा वाजता दोन मिनिटांचं मौन पाळून राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी आणि लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
राजघाटावर आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. (AIR NEWS)

54 Days ago