2022-23 या आर्थिक वर्षातील अखेरचा द्वैमासिक पत धोरण आढावा रिझर्व बँक आज जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पत धोरण समितीची बैठक सोमवारपासून झाली; यात झालेल्या चर्चेनंतर आज शक्तीकांत दास आज पत्रकार परिषदेत पत धोरण आढावा जाहीर करणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पातल्या घोषणा आणि तरतुदींच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेचे जीडीपी, आर्थिक वाढ आणि चलनफुगवट्याविषयीचे अंदाज काय असतील तसंच रेपो आणि रिव्हर्स रेपो व्याज दरात रिझर्व बँक काय बदल करते याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. (AIR NEWS)