आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

लडाखमधल्या चद्दर ट्रेक दरम्यान अडकलेल्या 107 पर्यटकांची हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका

News

लडाख केंद्रशासित प्रदेशात चद्दर ट्रेक या हिवाळी पदभ्रमण मोहिमेदरम्यान अडकलेल्या 107 जणांची वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुटका करण्यात आली. मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या या मोहमेत लडाखच्या नागरी प्रशासनासह जवळची लष्कराची पथकं तसंच स्थानिक आपत्ती निवारण पथकं सहभागी झाली होती.

हेलिकॉप्टरद्वारे सुटका केलेल्यांमधे पर्यटकांचा समावेश होता. अडकलेले इतर पर्यटक, मार्गदर्शक तसंच भारवाहक यांची सुटका होईपर्यंत ही मोहिम सुरु राहील, असं हवाईदलाच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं. गोठलेल्या झंस्कार नदीवर ही पदभ्रमण मोहिम सुरु असताना बर्फाचा काही भाग वितळल्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी अडकले होते. (AIR NEWS)

74 Days ago

Download Our Free App