A part of Indiaonline network empowering local businesses

लडाखमध्ये हिमवर्षाव सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, मात्र, जनजीवन विस्कळीत

news

लडाखमध्ये दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेला हिमवर्षाव आता सुरू झाला आहे. यामुळे प्रदीर्घ अशा कोरड्या हिवाळ्याशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एक इंच ते दोन फुटापर्यंत बर्फ जमा झाल्यानं इथल्या झऱ्यांच्या आणि हिमनद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक शेतीला चालना मिळेल. तसंच याचा एकंदरीत शेतीवर सकारात्मक परिणाम होईल.

मात्र, या बर्फवृष्टीमुळे लडाखमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या इतर भागाशी संपर्क विशेषत: हवाई संपर्क ठप्प झाला आहे. बर्फवृष्टी आणि शहरातील खराब हवामानामुळे लेहला जाणारी सर्व नऊ नियोजित उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. बर्फवृष्टी आणि गोठवणाऱ्या तापमानामुळे, रस्ता मोकळा होईपर्यंत वेगवेगळ्या प्रदेशांना जोडणाऱ्या झोजिला, पेंझिला आणि शिंकुला या खिंडींतून प्रवास न करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.दरम्यान, या भागातील मुख्य रस्ता आणि लिंक रोडवरील बर्फ हटवण्यासाठी सरकारी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत (AIR NEWS)

24 Days ago