A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

लम्पी त्वचा आजारावर भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेद्वारे लसीची निर्मिती

News

पाळीव जनावरांमधील लम्पी त्वचा आजारावर भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं लस शोधून काढली आहे. यावर्षी नोव्हेंबरपर्यंत या लस निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर राज्याला आवश्यक असणाऱ्या लसीच्या दोन कोटी मात्रा उपलब्ध करून देण्यात येतील. शासकीय संस्थेमार्फत अशी लस निर्मिती करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असल्याचं पशुसंवर्धन विभागाचे सह-आयुक्त डॉक्टर संतोष पंचपोर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. (AIR NEWS)

25 Days ago