विंग कमांडर दीपिका मिश्रा यांना नवी दिल्लीत काल झालेल्या कार्यक्रमात शौर्य पदकानं सन्मानित करण्यात आलं. हे पदक मिळवणाऱ्या हवाई दलातील त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल वी आर चौधरी यांनी दीपिका यांना हे पदक बहाल केलं. याच कार्यक्रमात आणखी ५८ जणांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कारांची घोषणा गेल्यावर्षी राष्ट्रपतींनी केली होती. २०२१ मध्ये मध्य प्रदेशात आलेल्या पूरातून दीपिका यांनी मोठ्या धैर्यानं ४७ नागरिकांचा जीव वाचवला होता. याच कामगिरीबद्दल दीपिका यांचा गौरव करण्यात आला. (AIR NEWS)