A part of Indiaonline network empowering local businesses

विमान उड्डाणाच्या विलंबाची माहिती देण्याबाबत मानक कार्यप्रणाली जारी

news

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपन्यांना विमान उड्डाणाबाबतच्या विलंबाची अचूक माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. महासंचालनालयाने काल विविध विमानतळांवर धुके आणि प्रतिकूल हवामानामुळे उड्डाण करण्यात येणारा व्यत्यय लक्षात घेऊन विमान कंपन्यांसाठी मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. यानुसार, विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांची संकेतस्थळे , संदेश यंत्रणा आणि विमानतळावरील माहिती यंत्रणेद्वारे सूचित करण्यास सांगितलं आहे. तसेच विमान कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांयना त्यांच्या उड्डाण विलंबाबद्दल प्रवाशांना योग्यरित्या संवाद, मार्गदर्शन आणि माहिती देण्याबाबत संवेदनशीलता बाळगण्यासदेखील सांगितलं आहे.

महासंचालनालयाने विमान कंपन्यांना; गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रतिकूल हवामानामुळे तीन तासांच्या कालावधीनंतरची कोणतीही अपेक्षित किंवा परिणामी उशीर होणारी उड्डाणे रद्द करण्याची परवानगी दिली आहे. (AIR NEWS)

44 Days ago