आयसीसी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत काल नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव केला. अफगाणिस्ताननं गतविजेत्या इंग्लंडला हरवल्यानंतर या स्पर्धेतील हा दुसरा धक्कादायक निकाल आहे. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सनं त्रेचाळीस षटकांमध्ये ८ गडी बाद २४५ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा संघ त्रेचाळीसाव्या षटकापर्यंत २०७ धावांवर सर्वबाद झाला. (AIR NEWS)