मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पावणे बारा वाजेदरम्यान त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कन्नडकडे प्रयाण करतील. कन्नड तालुक्यात अंधानेर इथं आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहून दुपारनंतर मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यात जेऊर कडे प्रस्थान करणार आहेत. शासन आपल्या दारी या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे प्रमाणपत्र तसंच आवश्यक कागदपत्रं एकाच ठिकाणी मिळणार आहेत. (AIR NEWS)