फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि माध्यमिक शालांत परीक्षांदरम्यान महाराष्ट्र राज्य माधामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षार्थींसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीमुळे दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. ही समुपदेशनाची सेवा परीक्षा कालावधीत दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असून, ऑनलाईन पद्धतीनं समुपदेशन केलं जाईल. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर समुपदेशकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (AIR NEWS)