श्रीनगर –जम्मू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येनं वाहनं अडकली

News

काश्मिर खोरं आणि जम्मूच्या पर्वतीय क्षेत्रात ताज्या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. श्रीनगर विमानतळावरही विमान सेवाही यामुळे प्रभावित झाली आहे. जवाहर बोगद्याजवळ काल रात्री जोरदार हिमवृष्टी झाल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

जम्मू राष्ट्रीय क्षेत्राचे वरीष्ठ पोलीस अधिक्षक जे एस जोहर यांनी ही माहिती दिली. पुढल्या चोवीस तासात काश्मिर खो-यात अनेक ठिकाणी हिमवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. (AIR NEWS)

45 Days ago