श्रीलंकेमध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे तीन जणांचा बळी

news

श्रीलंकेमध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे तीन जणांचा बळी गेला असून सुमारे 64 हजार नागरिकांना त्याची झळ पोहोचली आहे. आतापर्यंत 18 हजार नागरिक विस्थापित झाले असून त्यांची तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये सोय केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे.

उत्तर आणि पूर्वेकडच्या भागात गेल्या काही दिवसात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून अनेक जलाशय भरून वाहात आहेत. अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी आणि मदतीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे जवान कार्यरत आहेत. (AIR NEWS)

56 Days ago