A part of Indiaonline network empowering local businesses

श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या विधिंना सुरुवात

News

अयोध्येत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूजाविधींना कालपासून सुरुवात झाली. काल प्रायश्चित विधी झाला. यावेळी रामघाटवरील विवेक सृष्टी आश्रमात कर्मकुटी पुजा झाली. आज परिसर प्रवेश विधी होईल. प्रभू श्रीरामांना मंदिराच्या संपूर्ण परिसरात फिरवण्यात येईल. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे सदस्य डॉ अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते सर्व विधी होत आहेत. हे विधी २१ जानेवारीपर्यंत सुरू राहतील. गर्भगृहाच्या सर्व सुवर्ण दरवाजांचं काम पूर्ण झालं आहे. (AIR NEWS)

43 Days ago