A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नाही - राजेश टोपे

News

सध्या कोरोनाची चौथी लाट आल्यामुळे सध्यातरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार राज्य सरकार करत नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. आगामी गुढी पाडव्याच्या निमित्तानं निघणाऱ्या शोभा यात्रांबाबत कोरोना कृती दलानं सकारात्मक शिफारस केली तर निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यासाठी आणखी एक दिवस वाट पाहण्याची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करायला राज्य सरकारनं परवानगी दिली आाहे, पण शिस्तबद्द पद्धतीनं ही जयंती साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाचा प्रदुर्भाव आणखी कमी झाला तर, आपतकालीन कायदा मागे घेण्यावर सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (AIR NEWS)

363 Days ago