समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात पिंपळखुटा इथं हा अपघात झाला. टायर निखळल्यानं धावती बस पलटली, आणि दुभाजकाला धडकून रस्त्यावर घासत गेल्यानं तिने पेट घेतला, त्यात २८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, आमच्या बुलडाण्याच्या वार्ताहरानं दिली आहे. बुलडाण्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अपघात स्थळी धाव घेत, मदतकार्याचा आढावा घेतला. अपघातातल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. (AIR NEWS)