सुवर्णमहोत्सवी इफ्फी चित्रपट महोत्सवाचा आज दुपारी गोव्यात होणार प्रारंभ

News

५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात सुरुवात होत आहे. या चित्रपट महोत्सवाचा उद्धाटन सोहळा दुपारी साडेतीन वाजता पणजी इथल्या श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे.

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि श्रीपाद नाईक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात ७६ देश सहभागी झाले असून सुमारे ३०० चित्रपट बघायला मिळणार आहेत.

या महोत्सवासाठी सुमारे १० हजार प्रतिनिधींनी नावं नोंदवली असून अजूनही नाव नोंदणी सुरु आहे. सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था असून आजच्या उद्धाटन सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. (AIR NEWS)

99 Days ago