आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

सुशांतच्या खात्यातून १७ नाही, ५० कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

news

पाटणा (वृत्तसंस्था) : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे देशातील राजकीय तसेच प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच असून रिया चक्रवर्तीने केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीनेच लक्ष घातले आहे. याचवेळी बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्यातून कोट्यवधी रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्याआधी बॉलिवूडमधील गटबाजीमुळे सुशांतने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी रियाने करोडो रुपयांची अफरातफर केल्याचा तसेच सुशांत मानसिकदृट्या आजारी असल्याचे सर्वांना सांगण्याची धमकी दिल्याची माहिती बिहार पोलिसांना दिली. यानंतर मुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.

बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी सुशांत प्रकरणाच्या चौकशीवेळी त्याच्या पैशांवरून तपास का नाही केला, असा सवाल केला आहे. पांडे हे असे अधिकारी आहेत जे आपले मत कोणताही मुलाहिजा न राखता मांडत असतात. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या चार वर्षांमध्ये सुशांतच्या खात्यात जवळपास ५० कोटी रुपये आले होते. हैराण करणारी गोष्ट म्हणजे हे सर्व पैसे काढण्यात आले. एका वर्षातच १७ कोटी रुपये आले आणि त्यातील १५ कोटी रुपये काढण्यात आले. हे तपास करण्यासाठी पुरेसे कारण नाही का? आम्ही शांत बसणा-यांमधील नाही. आम्ही मुंबई पोलिसांनी प्रश्न विचारणार आहोत. अशा प्रकारच्या मोठ्या मुद्यांना का दाबले जात आहे?

(PRAHAAR)

56 Days ago
Advertise Here