आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

सुशांत सिंह आत्महत्या: बिहार पोलिसांकडून अंकिता लोखंडेची चौकशी

news

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार पोलिसांकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अंकिता लोखंडेची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. बिहार पोलीस काही वेळापूर्वीच अंकिता लोखंडेच्या घरी पोहचले. त्यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी केली. रिया सुशांतला त्रास देत होती, अशी माहिती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेदेखील बिहार पोलिसांना दिल्याचं समजत आहे.


२०१९ मध्ये अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बोलत असताना रियामुळे त्याला त्रास होत असल्याचं त्याने अंकिताला सांगितलं होतं. याचा पुरावा म्हणून अंकिताने सुशांतचे मेसेज देखील पोलिसांना दाखवले होते.

(PRAHAAR)

60 Days ago
Advertise Here