A part of Indiaonline network empowering local businesses

सेमीकंडक्टर क्षेत्राला चालना देण्यासाठी आज दिल्लीत तिसऱ्या सेमिकॉन इंडिया फ्यूचर डिजाइन रोड शो चं आय

news

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास, उद्योजकता राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर आज आय. आय. टी. दिल्ली इथं आयोजित तिसऱ्या सेमिकॉन इंडिया फ्यूचर डिजाइन रोड शो चं उद्घाटन करणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील सेमीकंडक्टरचे तज्ञ भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राला चालना देण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करतील.

नव्या पिढीतील सेमीकंडक्टर डिझायनर्सना प्रोत्साहित करणं, सहकार्यातून विकास तसंच ऑटोमोबाइल, मोबिलिटी, कम्युनिकेशन आणि कॉम्प्युटिंगसाठी स्वदेशी सेमीकंडक्टर चिप्स विकसित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या रोड शो चं आयोजन करण्यात आलं आहे.

सेमिकॉन इंडिया फ्यूचर डिझाइन सारख्या योजनांद्वारे अत्याधुनिक उपकरणं आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं देशात तयार करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी युवकांनी आणि स्टार्टअप्सनं यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूकीला आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं इंडिया सेमीकंडक्टर मिशनची सुरुवात करून 76 हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर रकमेची तरतूद केली असल्याचं राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं. (AIR NEWS)

20 Days ago