A part of Indiaonline network empowering local businesses

स्टेट बँक ऑफ इंडिया वर्तमान आर्थिक वर्षात देशभरात ३०० नवीन शाखा उघडणार

News

स्टेट बँक ऑफ इंडिया वर्तमान आर्थिक वर्षात देशभरात ३०० नवीन शाखा उघडण्याची योजना आखत आहे. SBI च्या सध्या देशभरात २२ हजार४०५ शाखा आणि २३५ विदेशी शाखा आणि कार्यालये आहेत. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, बँक आणखी व्यवसाय सहयोगी जोडण्याचा विचार करत आहे. SBI ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १६ हजार ८८४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ६ हजार ६८ कोटी रुपये होता. (AIR NEWS)

43 Days ago