A part of Indiaonline network empowering local businesses

स्ट्रांडजा मुष्टियुद्ध स्पर्धेत दोन भारतीय मुष्टियोद्ध उपांत्य फेरीत दाखल

News

बल्गेरिया इथे सुरू असलेल्या ७५ व्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत, अर्थात स्टँडजा २०२४ स्पर्धेत, दोन भारतीय मुष्टियोध्यांनी आपापल्या गटात उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल खेळल्या गेलेल्या सामन्यांत मुष्टियोद्धा सचिन याने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर ३-२ अशी मात करत, तर, सागर याने लीथूआनियाच्या खेळाडूचा ५-० असा सरळ पराभव करत उप-उपांत्य फेरी गाठली. आज ५१ किलो वजनी गटात भारतीय मुष्टियोद्धा अमितचा सामना यूक्रेनच्या खेळाडूशी, ७१ किलो वजनी गटात आकाशचा सामना फ्रेंच खेळाडूशी तर, ८० किलो वजनी गटात अभिमन्यु लॉराची गाठ फ्रेंच खेळाडूशी पडणार आहे. (AIR NEWS)

22 Days ago