Promote your Business

हरियाणामध्ये अटल किसान- मजदूर उपहारगृह सुरु

News

हरियाणा सरकारनं राज्यातल्या सर्व भाज्यांच्या मंडया आणि साखर कारखान्याच्या परिसरात अटल किसान- मजदूर उपहारगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपहार गृहांमधे सर्व शेतकऱ्यांना आणि कामगारांना १० रुपयांमध्ये जेवण मिळेल.

काल हरयाणाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्यपाल सत्यदेव नारायण यांनी आपल्या अभिभाषणात ही माहिती दिली. या वर्षी २५ उपहारगृह सुरु केली जातील कर्नल, भिवानी आदी भागात हे उपहारगृह सुरु देखील झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

हरियाणा परिवहनच्या बस मध्ये ४१ विविध श्रेणीतल्या लोकांना मोफत आणि किफायतशीर दरात प्रवास करता येईल, असंही ते म्हणाले. (AIR NEWS)

40 Days ago

Download Our Free App