हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सर मायकेल गँबन यांचं काल निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. ते न्युमोनियामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. हॅरी पॉटर चित्रपटांच्या मालिकेतील प्रोफेसर डंबलडोरच्या भूमिकेमुळे ते जगभरातल्या चाहत्यांचे आवडते अभिनेते होते. हॅरी पॉटरच्या आठपैकी सहा चित्रपटांत त्यांनी डंबलडोरची भूमिका केली होती.
सुमारे साठ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकार केल्या होत्या. चित्रपटासह नाटकांमध्येही त्यांनी केलेल्या भूमिकांबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते. (AIR NEWS)