आगामी शैक्षणिक वर्ष येत्या १३ जूनपासून सुरू होत असून, विद्यार्थ्यांना १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत येण्याची सूचना देण्याचे निर्देश, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी, शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. १३ आणि १४ जूनला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसंच आरोग्यविषयक बाबींचं नियोजन करण्यास सांगण्यात आलं आहे. जून महिन्यातील विदर्भाचं तापमान लक्षात घेता तिथलं शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होत असून विद्यार्थ्यांना २७ जूनला प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (IMPUT FROM AIR )