१३ व्या संसद पुरस्कारांसाठी १३ खासदारांची निवड करण्यात आली आहे. लोकसभेतून विद्युत बरन महतो, डॉ. सुकांता मजुमदार, डॉ. हीना गावित, गोपाल शेट्टी आणि सुधीर गुप्ता, अधीर रंजन चौधरी, कुलदीप राय शर्मा इत्यादींना संसदरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे. तर राज्यसभेतून डॉ. मनोज कुमार झा, फौजिया खान, डॉ. जॉन ब्रिटास यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार माजी सीपीआय खासदार टीके रंगराजन यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय लोकसभेतल्या वित्त समिती आणि राज्यसभेतल्या परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समितीचीही या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. संसद रत्न पुरस्कार विजेत्या खासदारांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. (AIR NEWS)