A part of Indiaonline network empowering local businesses

१९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियाशी होणार

News

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा १ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानच्या १७९ धावांच्या उत्तरादाखल ऑस्ट्रेलियानं ९ गाडी बाद १८१ धावा काढून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात अझान अवेस आणि अराफत मिन्हास यांनी अर्धशतकं झळकावली तर टॉम स्ट्रेकरनं सहा गडी बाद केले. यापूर्वी उदय शरणच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं उपांत्य फेरीत, दक्षिण आफ्रिकेचा दोन गडीराखून पराभव करत अंतिम लढतीत स्थान निश्चित केलं. (AIR NEWS)

20 Days ago