आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

news

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत संरक्षण करार नेमका कसा होणार आहे.

याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटीनंतर ट्रम्प यांनी मंगळवारी दोन्ही देशांमधील ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराची घोषणा केली. या दरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत दहशतवादासंदर्भात कडक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने चालवलेल्या दहशतवादाला लगाम घालण्याची गरज असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प आणि मोदी या दोन नेत्यांनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा यावेळी संदर्भ दिला. हा भारत दौरा आपण कधीही विसरणार नाही, असेही ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले.

या करारात अमेरिकेकडून २४ एमएच ६० रोमियो हेलिकॉप्टरची २.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीत खरेदी करण्यात येणार आहे. आणखी एक करार हा सहा एएच ६४ ई अपाचे हेलिकॉप्टरबाबतचा आहे. या करारांतर्गत ८० कोटी डॉलर्सची खरेदी करण्यात येणार आहे. ३ अब्ज डॉलर्सहून अधिकच्या या संरक्षण करारामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही भारत आणि अमेरिका भागीदारीबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात संरक्षण आणि सुरक्षेचा समावेश आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी माहिती देताना सांगितले. आम्ही ऊर्जा धोरणात्मक भागीदारी, व्यापार आणि पिपल-टू-पिपल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे मोदी म्हणाले. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत-अमेरिकेदरम्यान मजबूत होत असलेले संबंध आमच्या भागीदारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, असेही मोदी म्हणाले.

ट्रम्प यांनी यावेळी दहशतवादाचा आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी आणि मी आपल्या नागरिकांना कट्टर इस्लामी दहशवादापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. पाकिस्तानच्या भूमीत सुरू असलेल्या दहशतवादाला रोखण्यासाठी अमेरिका पाऊल उचलत असल्याचे ट्रम्प म्हणाले.

पाहुणचाराने भारावून गेलो : ट्रम्प
भारतीय पाहुणचाराने मी भारावून गेलो आहे. येथील भव्य दिव्य स्वागत समारंभ मी कधीही विसरणार नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इतकेच नाही ताजमहाल येथे दिलेली भेट अविस्मरणीय होती असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी भारतासोबतचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

(PRAHAAR)

33 Days ago

Download Our Free App