A part of Indiaonline network empowering local businesses

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालाण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

News

बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालायच्या पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. चित्रपटावरच्या बंदीच्या पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाच्या आदेशाला चित्रपट निर्मात्यांनी आव्हान दिलं होतं. त्या याचिकेवरची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, पी एस नरसिंहा, जे.बी.पारदीवाला यांच्यासमोर झाली.

तामिळनाडूतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तामिळनाडू राज्य सरकारनं कोणत्याही प्रकारे निर्बंध घातलेले नाहीत असं तामिळनाडू राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं. तामिळनाडूत या चित्रपट प्रदर्शनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या राज्यात चोख बंदोबस्त राखण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकारला केली.

सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला दिलेल्या परवानगीविरोधातल्या याचिकेची सुनावणी उन्हाळी सुटीनंतर होईल. (AIR NEWS)

282 Days ago