A part of Indiaonline network empowering local businesses

खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

News

खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५७ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कास्य अशी एकंदर १५८ पदकं पटकावली. ३८ सुवर्ण पदकांसह ९८ पदकं मिळवून तामिळनाडूनं दुसरं,तर ३५ सुवर्ण पदकांसह १०३ पदकं जिंकत हरियाणानं तिसरं स्थान पटकावलं. महाराष्ट्रानं जलतरण क्रीडा प्रकारात सर्वाधिक २७ पदकं जिंकली.जिम्नास्टिक्समध्ये १७, कुस्ती-१४, भारत्तोलन-तेरा ॲथलेटिक्स-१२ तर योगासनांमध्ये ११ पदकं मिळवली.केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. (AIR NEWS)

28 Days ago