A part of Indiaonline network empowering local businesses

गाझा पट्टीत मदत पोहोचवण्यासाठी इजिप्तची राफाह सीमेवरील दरवाजे उघडण्यास मान्यता

News

इस्रायल आणि पॅलेस्टीनी दहशतवादी गट हमास यांच्यातील संघर्षामुळे उद्भवलेला तणाव कमी करण्यासाठी मानवीय मदत या स्वरुपात 20 ट्रक्सना गाझामध्ये जाण्यासाठी ईजिप्तने आपल्या सीमेवरील राफाह इथले दरवाजे उघडण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी या संदर्भात ईजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्तह एल-सिसी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मदत साहित्य गाझाला जाऊ देण्याचं त्यांनी मान्य केलं. इस्रायलच्या भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना बायडन बातमीदारांशी बोलत होते.

आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटनांसोबत दोन्ही देशांचे अधिकारी मदत साहित्य पोहोचवण्यात समन्वय साधतील असं ईजिप्तनं एका निवेदनात सांगितलं. दरम्यान ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला जाणार आहेत. अल अहली रुग्णालयावरील हल्ला या प्रदेशातील नेत्यांसाठी डोळे उघडवणारा असून हा संघर्ष आणखी धोकादायक पातळीवर पोहोचणं टाळण्यासाठी जगभरातील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन सुनक यांनी केलं आहे.
(AIR NEWS)

51 Days ago