ग्रेटर नॉएडा इथं कार रस्त्यावरून घसरून कालव्यात पडल्यानं सहा जण ठार

News

उत्तरप्रदेशात, ग्रेटर नॉएडा इथं काल रात्री कार रस्त्यावरून घसरून कालव्यात पडल्यानं सहा जण ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात कारमधले इतर पाच जण जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

अपघातग्रस्त कारमध्ये एकूण ११ लोक होते. डंकाऔर भागातल्या खेरली कालव्यात कार कोसळली. पोलिसांनी सांगितलं की, धुक्यामुळे दृष्यमानता कमी असल्यानं अपघात घडल्याचं प्रथम दर्शनी दिसतं. (AIR NEWS)

59 Days ago