चांद्रयान -दोन चा ऑर्बिटर आणि चांद्रयान -३ च्या लॅण्डर मोड्यूल विक्रम यांच्यात संपर्क प्रस्थापित झाला असल्याची माहिती इस्रो नं दिली आहे. यामुळे लॅण्डर विक्रमशी संवाद साधण्यासाठी एक अतिरिक्त साधन असणारे चॅनल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं शक्य होईल. जुलै २०१९ मध्ये चांद्रयान -२ मोहिमेअंतर्गत सोडलेले चांद्रयान चंद्राभोवती प्रदक्षिणा करत असून त्याच्याशी आता चांद्रयान -३ चा संपर्क प्रस्थापित झाला आहे. चांद्रयान -३ मोहीमेतील लॅण्डर मॉड्यूल चंद्रावर उतरवण्यासाठी सुरक्षित क्षेत्र शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लॅन्डरला असणारे संभाव्य धोके ओळखून ते टाळण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कॅमेऱ्याच्या साहाय्यानं चंद्राच्या पृष्ठभागाची काही छायाचित्र घेतली आहेत. ही छायाचित्रं इस्रोनं आज प्रसारित केली. येत्या बुधवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी हे मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या वाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर संध्याकाळी पाच वाजून २० मिनिटांपासून करण्यात येईल अशी माहिती इस्रो नं दिली आहे. (AIR NEWS)