जागतिक शाश्वत विकासाच्या निर्धारित ध्येयपूर्ती वर्षाच्या अगोदरच पाच वर्ष म्हणजेच वर्ष २०२५ पर्यंत भारतातूनगा क्षयरोचं समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला. जिनिव्हा इथं सुरू असलेल्या ७६व्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये क्षयरोगावर आधारित क्वाड प्लस साईड इव्हेंट मध्ये ते बोलत होते. जगात केवळ भारतानं क्षयरोगाचा धोका जाणून घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा तयार केली आहे आणि त्यामुळेच आपल्याला क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वर्ष २०१५ ते २०२२ या काळात, १३ टक्के घट करण्यात यश मिळाले आहे. जगभरात हा दर १० टक्के इतका आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
क्षयरोगानं मृत्यू होण्याचा जागतिक दर ५ पूर्णांक ९ दशांश टक्के इतका असताना, भारतानं मात्र क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर पंधरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळवलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. स्थानिक पुराव्यांवर आधारित गणितीय मॉडेलचा वापर करून भारत, जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक अहवाल येण्याअगोदरच वाढत्या क्षयरोगाच्या जागतिक समस्येचे अनुमान काढू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. (AIR NEWS)