A part of Indiaonline network empowering local businesses

भारत - इंग्लंड क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचं शतक

News

विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, आज तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर संपला. पहिल्या डावात भारतानं १४२ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे या सामन्यात भारताकडे आता ३९८ धावांचा आघाडी झाली आहे. आज शुभमन गिलनं शतक पूर्ण केलं. त्यानं १०४ धावा केल्या. विजयासाठी इंग्लंडला दुसऱ्या डावात ३९९ धावा कराव्या लागणार आहेत. आज दिवसअखेर त्यांच्या १ बाद ६७ धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी ३३२ धावांची गरज आहे. (AIR NEWS)

24 Days ago