विधान परिषदेसाठी विविध उमेदवारांनी दाखल केले अर्ज

news

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेवरील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे संजय दौंड यांनी आज अर्ज दाखल केला.

यावेळी राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिन बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. विधान परिषदेसाठी भाजपा आणि मित्र पक्षाचे उमेदवार राजन तेली यांनीही आपला उमेदवारी अर्ज याच जागेसाठी आज भरला.ते या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

राजन तेली यांचे पक्षाच्या पलीकडे विविध पक्षात मित्रत्वाचे संबंध आहेत, त्याचाही उपयोग या ठिकाणी निश्चितपणे येईल. तसंच राजकारणातील राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात, त्यामुळे ते या निवडणुकीत नक्कीच विजयी होतील, असंही दरेकर यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेकरीता होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे दाखल केला. (AIR NEWS)

43 Days ago