उत्तराखंडच्या अनेक भागात काल रात्रीपासून मुसळधार ते मध्यम पाऊस पडत आहे. परिणामी राज्यातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. हवामान खात्याने डेहराडून, पौरी, चंपावत, टिहरी नैनिताल, हरिद्वार आणि उधम सिंह नगर जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा नारंगी बावटा फडकवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात राज्याच्या इतर भागातही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानाचा इशारा लक्षात घेता, डेहराडून, हरिद्वार आणि चंपावत जिल्हा प्रशासनाने सर्व अंगणवाडी केंद्रे आणि 12वी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशातल्या सोलन जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. (AIR NEWS)