50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येत्या बुधवारपासून सुरुवात

News

50 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या बुधवारी गोवा इथं सुरु होत आहे. महोत्सवात 12 हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

यंदा खुल्या रजतपटावर काही अत्यंत लोकप्रिय चित्रपटांचा आस्वाद रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे. त्यासाठी नोंदणीची कुठलीही अट ठेवण्यात आलेली नाही.

यंदाच्या सुवर्णजयंती महोत्सवाची संकल्पना ‘सिनेमाचा आनंद’ अशी असल्यामुळे सर्व रसिकांसाठी खुला पडदा ठेवण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. (AIR NEWS)

101 Days ago