A part of Indiaonline network empowering local businesses

H3N2 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाचा आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इ

news

राज्यात H3N2 विषाणूची लागण होऊन दोन मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर इथं एका जेष्ठ नागरिकाचा H3N2 ने मृत्यू झाला होता त्यानंतर काल अहमदनगर इथल्या एका वैद्यकिय विद्यार्थ्याचा H3N2 ने मृत्यू झाला.

राज्यात H3N2 ने मृत्यू पावलेले दोन्ही रुग्ण इतर आजारांनीही बाधित होते असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगीतलं. सध्या राज्यात साडेतीनशे रुग्णांच्या H3N2 विषाणू चाचण्या सकारात्मक आल्याचं त्यांनी नमूद केलं. (AIR NEWS)

440 Days ago