A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

Heart Attack : हार्टअटॅकचे प्रमाण का वाढले?

news

कोरोनानंतर हृदयविकाराची (Heart Attack) लाट येणार; घाबरू नका, तब्बेतीकडे लक्ष द्या! मुंबई : गेल्या वर्षी आपण बघितले की कोणताही आजार नसलेल्या तरुणांचा अचानक मृत्यू (Heart Attack) झाला. बसून गप्पागोष्टी करत असताना, नाचताना, व्यायाम करताना, गाडी चालवत असताना अचानक मृत्यू झाल्याचे शेकडो व्हिडिओ समोर आले होते. अपघाती मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू हृदयविकाराशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे फक्त भारतातच घडले नाही. तर २०२२ मध्ये जगभरात असे लाखो मृत्यू झाले आहेत. हीच परिस्थिती २०२३ मध्ये सुद्धा असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. २०२३ हे २१व्या शतकातील सर्वात वाईट वर्ष कदाचित २०२३ मध्ये यात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. २०२३ हे २१व्या शतकातील सर्वात वाईट वर्ष असू शकते. चालता-फिरता मृत्यूत वाढ होईल. कोरोना महामारीमुळे सुपरबगचा धोका वाढला आहे. हे सर्व होणारच आहे पण आपण भीतीने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली. नियमित आरोग्यविषयक तपासणी करून त्यानुसार राहणीमानात बदल केले तर संभाव्य धोके आपल्याला टाळता येतील, असे स्पष्ट मत मानस आणि आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रशिया – युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम २०१९ सरत असताना पहिल्यांदा चीनमध्ये कोरोनाने दार ठोठावले. आणि २०२० मध्ये हा हा म्हणता ते जगभक पसरले. एक वर्ष आपण आपल्याच घरात कैद होतो. जेव्हा २०२१ आले, तेव्हा असे वाटत होते की, गोष्टी चांगल्या होतील, परंतु आणखी वाईट होत गेले. त्यानंतर २०२२ पासून आपल्याला अनेक अपेक्षा होत्या. पण रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. आता २०२३ सुरू झाले आहे. परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे, परंतु तज्ज्ञांच्या मते २०२३ हे या शतकातील सर्वात वाईट वर्ष असू शकते. कोविड रूग्णांमध्ये रक्त गोठण्याची प्रकरणे वाढली लंडनच्या क्वीन्स मेरी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, इंग्लंडमधील कोविड रूग्णांमध्ये रक्त गोठण्याची प्रकरणे २७ पट, हृदय बंद पडण्याची प्रकरणे २१ पट आणि स्ट्रोकची प्रकरणे १७ पट वाढली आहेत. इंग्लंडमध्ये कोरोनापूर्वी कोणत्याही रुग्णाला हृदयाच्या उपचारासाठी १ वर्षापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागत नव्हती. ऑगस्ट २०२२ मध्ये अशा रुग्णांची संख्या सुमारे ७ हजार झाली आहे. कोविडपूर्वी अमेरिकेमध्ये दरवर्षी सुमारे १.४३ लाख नागरिकांना हृदयविकाराचा झटका येत होता, परंतु कोविडच्या पहिल्या लाटेनंतर हे आकडे १४ टक्क्यांनी वाढले आहेत. दुसऱ्या लहरीनंतर, २५ ते ४४ वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. हृदयविकाराची लाट येणार! ऑक्सफर्डच्या अभ्यासानुसार, गंभीर कोविडमधून बाहेर पडलेल्या १० पैकी ५ लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. तज्ञांचा असा विश्वास आहे की, कोविड साथीच्या रोगाचा अप्रत्यक्ष परिणाम कोविडपेक्षाही मोठा असू शकतो. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे पूर्वीच्या महामारींमधून घेतलेला काही बोध आहे. १९१८च्या स्पॅनिश फ्लूनंतर ब्रेन फॉग आणि सतत थकवा येण्याची प्रकरणे आढळून आली. ब्रेन फॉग म्हणजे विचार करणे, लक्षात ठेवणे आणि लक्ष केंद्रित करण्यात त्रास होतो. स्पॅनिश फ्लू नंतर वारंवार हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे देखील पाहिली गेली. १९४० ते १९५९ या काळात हृदयविकाराची लाट आली. अनेक हृदयविकाराच्या घटना विचित्र आणि स्पष्ट करणे कठीण होत्या, परंतु आज आपल्याला माहित आहे की, स्पॅनिश फ्लू साथीचा रोग यासाठी जबाबदार होता. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या संशोधनानुसार, कोविडच्या दुष्परिणामांचा परिणाम स्पॅनिश फ्लूपेक्षा वाईट असू शकतो. तसेच अतिशय गंभीर बाब म्हणजे, रशिया-युक्रेनच्या लढाईचे आता अणुयुद्धात रूपांतर होण्याची शक्यता आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई सुरू केली. युक्रेन ४८ तासांच्या आत आत्मसमर्पण करेल, असे बहुतेक युद्ध तज्ञांचे मत होते, परंतु तसे झाले नाही. गेल्या १० महिन्यांपासून हे युद्ध सुरू आहे. यूएस आणि यूके सारख्या देशांनी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे पाठवली आहेत आणि २०२३ मध्ये मदत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अणुयुद्ध होऊ शकते, ज्यामुळे लाखो लोक मारले जातील आणि जग कायमचे बदलेल. मीडिया उगाचच लोकांना घाबरवते का? काही जण असा विचार करतात की, असे काहीही होणार नाही, मीडिया उगाच प्रत्येक गोष्टीचा बाऊ करते. लोकांना घाबरवले जाते. परंतु या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणारे तज्ञ हे अशी परिस्थिती घडू शकते याबाबत स्पष्ट इशारा देत आहेत. तसेच यामुळे घाबरून न जाता येणा-या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपणच आपली काळजी घ्यायला हवी, असाही सल्ला दिला आहे. संग्रहीत छायाचित्र अणुहल्ल्याचा धोका पुलित्जर पारितोषिक विजेते पत्रकार ख्रिस हेजेस यांनी या युद्धासाठी नाटो आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, हे युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास रशिया आणि अमेरिकेच्या प्रॉक्सी युद्धाचे रूपांतर थेट लढ्यात होऊ शकते. त्यामुळे अणुयुद्ध होण्याची शक्यता आहे. युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे संचालक जेरेमी शपिरो म्हणतात की, दोन्ही बाजू एस्केलेटरच्या चक्रात अडकल्या आहेत. सध्याचे ट्रेंड त्यांना थेट संघर्ष आणि नंतर आण्विक युद्धाकडे घेऊन जात आहेत. ज्यात लाखो लोकांचा मृत्यू होईल. शपिरो म्हणतात की, जर रशिया वाईटरित्या पराभूत झाला तर ते सामरिक बॉम्ब वापरतील, ज्यावर नाटो प्रत्युत्तर देईल. हे सर्व काही मिनिटांत होऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युक्रेनला यश मिळण्याची शक्यता जितकी जास्त असेल तितका रशियन अणुहल्ल्याचा धोका जास्त असेल. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, रशियन अधिकाऱ्यांनी त्यांच्या लोकांना संभाव्य आण्विक वापरासाठी तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे की, युक्रेनचे लोक रशियन अण्वस्त्र हल्ल्यासाठी सज्ज होत आहेत. याआधी अमेरिकेने जपानमधील नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. यामध्ये सुमारे २ लाख लोक मारले गेले. जे वाचले ते अपंग झाले. शहरे उद्ध्वस्त झाली. त्याचा प्रभाव अनेक पिढ्यांपर्यंत राहिला. २०२३ मध्ये सुपरबगचा मोठा धोका, सुपरबग म्हणजे काय? याशिवाय कोरोना नंतर आता २०२३ मध्ये सुपरबग मोठा धोका बनू शकतो. सुपरबग हा कोणत्याही जीवाणू, विषाणू आणि परजीवींचा एक प्रकार आहे. कोविड-१९ टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले आहे. या लसीचे सामान्य वर्तन म्हणजे कोविडशी लढण्याची क्षमता निर्माण करणे. परंतु जेव्हा कोरोना विषाणूचा असा ताण येतो ज्यावर लसीचा परिणाम होत नाही. म्हणजेच, जर कोरोना व्हायरसच्या वारंवार बदल झालेल्या या नविन व्हेरियंटने लसीविरूद्ध अँटीबॉडीज विकसित केले, तर कोविड विषाणूच्या या ताणाला त्याचे सुपरबग आवृत्ती म्हटले जाईल. वैद्यकीय क्षेत्रात या स्थितीला व्यावसायिक भाषेत अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणतात. म्हणजेच रुग्णाच्या शरीरात असलेल्या जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांच्यासमोर औषधी उपयोगी ठरत नाही, तेव्हाची परिस्थिती. यामुळे कोरोना व्हायरस नंतर निर्माण झालेली परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. सुपर बग हे वैद्यकीय शास्त्रासमोर मोठे आव्हान सुपर बग हे वैद्यकीय शास्त्रासमोर गेल्या काही वर्षांत मोठे आव्हान बनले आहे. वैद्यकीय जर्नल लॅन्सेटच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, जर परिस्थिती सुधारली नाही तर सुपरबग दरवर्षी १० दशलक्ष लोकांचा बळी घेऊ शकतो. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कोरोनामुळे सुमारे ६० लाख मृत्यू झाले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या संशोधनानुसार, भारतात न्यूमोनिया आणि सेप्टिसिमिया (रक्त संक्रमण) उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषध, कार्बापेनेम औषध आता जीवाणूंवर कुचकामी ठरले आहे. त्यानंतर या औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली. गेल्या १५ वर्षांत अँटिबायोटिक्सचा वापर ६५ टक्क्यांनी वाढला स्कॉलर अ‍ॅकॅडमिक जर्नल ऑफ फार्मसीच्या अहवालानुसार, गेल्या १५ वर्षांत अँटिबायोटिक्सचा वापर ६५ टक्क्यांनी वाढला आहे. सर्दी आणि खोकल्यासाठी लोक अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर करत आहेत. त्यामुळे आता ते अँटिबायोटिक्स सर्दी आणि खोकल्यासाठी फारसे प्रभावी दिसून येत नाही. सुपर बगमुळे अमेरिकेला ५ अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे, जे भारताच्या एकूण आरोग्य बजेटच्या निम्मे आहे. तर वैद्यकीय शास्त्राची सर्व प्रगती शून्य होईल अमेरिकेच्या एमोरी युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड वाईज यांच्या म्हणण्यानुसार, प्रतिजैविकांचा वापर असाच वाढत राहिला तर वैद्यकीय शास्त्राची सर्व प्रगती शून्य होईल. त्यामुळे आपण अशा स्थितीत पोहोचू, जिथे किरकोळ दुखापतही प्राणघातक ठरत होती. पीईडब्ल्यूच्या संशोधनानुसार, डॉक्टरांनी रुग्णांना दिलेल्या प्रत्येक ३ अँटिबायोटिक्सपैकी १ वाया जाते. दरवर्षी अशा ४०० दशलक्षाहून अधिक प्रिस्क्रिप्शन लिहिल्या जातात. कोविडच्या काळात गेल्या दोन वर्षांत अँटिबायोटिक्सचा बिनदिक्कतपणे वापर करण्यात आला. गेल्या तीन वर्षांत बॅक्टेरियांनी अनेक प्रतिजैविकांच्या विरोधात प्रतिकार शक्ती संपादन केली आहे. अमेरिकेत सुपरबग्समुळे होतो दर १० मिनिटांनी एका रुग्णाचा मृत्यू सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या संशोधनानुसार कोविडमुळे सुपर बगचा धोका वाढला आहे. त्याचा परिणाम २०२३ मध्ये मोठ्या लोकसंख्येवर दिसून येईल. या वर्षी सुपर बग संख्यात्मकदृष्ट्या किती जीव घेऊ शकतो हे तज्ञ अद्याप सांगण्याच्या स्थितीत नाहीत. सध्या, सुपरबग्समुळे भारतात दरवर्षी सुमारे ६० हजार नवजात बालकांचा मृत्यू होत आहे, तर अमेरिकेत सुपरबग्समुळे दर १० मिनिटांनी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मार्च २०२२ मध्येच सुपरबगचा धोका आणि त्यामुळे होणाऱ्या विनाशाची भीती व्यक्त केली आहे. बायडेन सरकारने सुपर बगशी लढण्यासाठी २०२३ मध्ये विशेष निधी जारी करण्याचे सांगितले आहे. औषधे बनवणाऱ्या वैद्यकीय कंपन्यांना हा निधी दिला जाईल, जेणेकरून त्या कंपन्या संशोधन करून या सुपर बगशी लढण्यासाठी नवीन औषधे तयार करू शकतील. हे पण वाचा : व्यायाम करताना हृदयविकार.. सावधान!The post Heart Attack : हार्टअटॅकचे प्रमाण का वाढले? first appeared on . (PRAHAAR)

473 Days ago