A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

अभिनेता रतन चोप्रा यांचे निधन

news

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता रतन चोप्रा यांचे निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. याच आजाराने पंजाबच्या मलेरकोटलाा येथे त्यांचे निधन झाले. रतन हे अविवाहित होते. मात्र, त्यांनी अनिता या मुलीला दत्तक घेतले होते. तिनेच अभिनेत्याची मृत्यूची बातमी दिली.


अनितानं सांगितलं, की जानेवारी २०२० मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. अभिनेत्याकडे उपचारासाठी पैसे शिल्लक नव्हते. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, रतन चोप्रा यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले, की १० दिवसांपूर्वी त्यांनी धर्मेंद्र, अक्षय कुमार आणि सोनू सूद यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुरुद्वारा आणि मंदिरांमधून मिळणा-या अन्नावर गेले काही दिवस ते जगत होते.

हरियाणाच्या पंचकुला येथे एका भाड्याच्या घरात ते राहात होते. अभिनेत्याने १९७२ मध्ये आलेल्या मोम की गुडिया सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, आजीने चित्रपटसृष्टीतील करिअरला विरोध केल्याने त्यांनी लवकरच बॉलिवूडला रामराम ठोकला होता. यानंतर त्यांनी पंजाबच्या अनेक शाळा आणि संस्थांमध्ये इंग्रजीचे धडे देण्यास सुरुवात केली होती.

(PRAHAAR)

1402 Days ago