A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना

News

इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जकार्ता इथं आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता हा सामना सुरू होईल.

यावेळी अ गटात गतविजेत्या भारताबरोबर पाकिस्तान, जपान आणि यजमान इंडोनेशियाचा समावेश आहे. भारताचा दुसरा सामना येत्या २४ तारखेला इंडोनेशियाशी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी तीन वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेतले आघाडीचे ३ संघ पुढच्या वर्षी भुवनेश्वर आणि राउरकेला इथं होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. (AIRNEWS)

697 Days ago