A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

ईशान्येकडील राज्यांना गेल्या वर्षात सुमारे १ कोटी १८ लाख देशी आणि १ लाख परदेशी पर्यटकांच्या भेटी

News

देशाच्या ईशान्येकडील राज्यांना गेल्या वर्षात सुमारे १ कोटी १८ लाख देशी आणि एक लाख परदेशी पर्यटकांनी भेटी दिल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. काल लोकसभेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली.

केंद्राने २०१६ मध्ये, - उडान योजनेचा प्रारंभ केला होता, यामुळे सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत हवाई प्रवास करणे शक्य झाले. तसेच ईशान्येकडील क्षेत्रात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालायाने पाच हजार किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग विकासकामांना मंजुरी दिली. या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ईशान्येकडील पर्यटनवृद्धीसाठी मुक्त वातावरण निर्माण होत असल्याचेही रेड्डी आपल्या उत्तरात सांगितले आहे. (AIR NEWS)

388 Days ago