A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

उत्तर भारतात काही ठिकाणी पाऊस आणि हिमवर्षाव/ थंडीची लाट तीव्र

News

देशाच्या उत्तरेकडच्या भागात काल पाऊस आणि हिमवृष्टी झाल्यानं थंडीची लाट तीव्र झाली आहे. दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडला तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी आणि पावसाची नोंद झाली.

पाऊस आणि हिमवृष्टीमुळे बोचरी थंडी निर्माण झाली आणि पारा आणखी खाली घसरला. दिल्ली आणि लगतच्या भागांमध्ये मध्यम पाऊस झाला. आजही दिल्लीतलं कमाल तापमान 16 आणि किमान तापमान 9 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबर हवाई सेवांवरही परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे नैनीतालसह काही ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी केंद्र बंद ठेवली आहेत. (AIR NEWS)

1562 Days ago