A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

news

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून, धुळे शहरात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. आज सकाळी किमान तापमान साडेपाच अंश सेल्सिअस मोजलं गेलं. जिल्ह्यात तीन दिवसांपासून गार वारे वाहत असल्यानं तापमानात घसरण झाली आहे.
काल किमान तापमान ६ अंश सेल्सिअस होतं. तर शनिवारी साडेआठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. जानेवारी उलटल्यानंतरही तापमानाचा पारा घसरल्यानं हुडहुडी भरत आहे.

नाशिक शहरातही थंडीचा कडाका वाढला असून आज ९ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस असं जिल्ह्याचं किमान तापमान होतं. तर, निफाड इथं जिल्ह्यातली निचांकी, ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पारा घसरत असून काल १० अंश सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं. (AIR NEWS)

1162 Days ago