A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरूच

news

उत्तराखंड राज्यातल्या हिम प्रकोपानंतर चमोली जिल्ह्यातल्या तपोवन भागात बोगद्यात अडकल्याची शक्यता असलेल्या २५ ते ३५ कामगारांचा शोध आणि बचाव करण्याचे काम काल रात्रीही सुरुच होते. आतापर्यंत ३६ मृतदेह सापडले असून १६८ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

तपोवन इथल्या धौली गंगा विद्युत प्रकल्पाला पुराचा तडाखा बसून शंभरहून अधिक तास उलटले असले तरी बोगद्यातील बचाव कार्य सुरुच आहे.

नदीची पातळी वारंवार वाढत असल्याने कामात अडथळे येत आहेत. बोगद्यात कामगार जिथे अडकले असण्याची शक्यता आहे, त्या १८० मीटर आतपर्यंत पोहोचण्याचा बचाव पथकांचा प्रयत्न सुरू आहे.

बचाव पथकाची आणि आवश्यक सामानाची ने-आण करण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. (AIR NEWS)

1160 Days ago