केंद्रीय मंत्रिमंडळाने एकात्मिक शहरी व्यवस्थापनासाठीच्या 'सिटी इन्व्हेस्टमेंट्स टू इनोव्हेट, इंटिग्रेट अँड सस्टेन २' योजनेलाही काल मान्यता दिली. CITI-IS २ हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय तसंच फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD), युरोपियन युनियन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स यांच्या मदतीनं तयार करण्यात आला असून तो २०२३ ते २०२७ या चार वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
शहरी स्तरावर एकात्मिक कचरा व्यवस्थापन, तसंच राज्य स्तरावर हवामानाभिमुख सुधारणा कृती कार्यक्रम आणि राष्ट्रीय स्तरावर संस्थात्मक बळकटीकरण आणि ज्ञानाचा प्रसार यावर या कार्यक्रमातून भर दिला जाणार आहे. याकरता स्पर्धात्मक पद्धतीने निवडलेल्या प्रकल्पांना पाठबळ मिळून वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. (AIR NEWS)