A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

ऑनलाइन शिक्षणाच्या कक्षा रुंदावणार

News

मुंबई (प्रतिनिधी) : ऑनलाइन शालेय शिक्षणासाठी आता दूरदर्शनची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे या शिक्षणाची कक्षा राज्यात रुंदावणार आहे. दूरदर्शनवर दररोज चार ते पाच तास ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका बैठकीत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

लॉकडाऊन काळात शहरापासून ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी दूरदर्शनवर दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास ऑनलाईन शिक्षणासाठी देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती गायकवाड यांनी या बैठकीत दिली.

जिओ टीव्हीवर प्रयोगिक तत्त्वावर दहावी व बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी आता एकाच स्वतंत्र वाहिनीऐवजी तब्ब्ल ५ स्वतंत्र वाहिन्यांचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्ही वर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे सुद्धा नियोजन आहे असे सांगण्यात आले.

१५ जुलैपर्यंत बारावीचा, जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते, मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरपर्यंत दहावीचा निकाल लावू. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून त्यांचे स्कॅनिंग वेगाने सुरु आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ती ऑफलाईन असेल. ज्या प्रक्रियेबाबत तक्रारी येता कामा नयेत, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वषापार्सून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अ‍ॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

(PRAHAAR)

1394 Days ago