चीन आणि इतर देशांमध्ये नॉव्हेल कॉरोना विषाणूचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर मेघालयमध्ये राज्य सरकार अतिशय दक्ष असून सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे.
राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री ए एल हेक यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. गुवाहाटी आणि उमरोई इथल्या विमानतळ प्राधिकरणांनाही त्यांनी पत्र लिहून प्रवाशांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. (AIR NEWS)