A part of Indiaonline network empowering local businesses
Chaitra Navratri

कोरोना काळात उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या भूमिकेचं जागतिक बँकेकडून स्वागत

news

कोरोना काळात उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या भूमिकेचं जागतिक बँकेने स्वागत केले आहे. जागतिक बँकेनं सादर केलेल्या अहवालात, स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताने सरकारी दृष्टीकोन स्वीकारला, त्यामुळे कोविड महासाथीच्या काळात एकक किंमतीवरील तसेच जागतिक पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली. सरकारनं मोठ्या प्रमाणात खरेदी करतानाही गुणवत्तेशी तडजोड केली नसल्याचंही या अहवालात म्हटले आहे. जागतिक बँकेच्या या अहवालात, कोविड महासाथीच्या सुरूवातीच्या टप्प्यात, अत्यावश्यक वैद्यकीय वस्तूंचा खात्रीशीर सातत्यपूर्ण पुरवठा करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या पुढाकाराचा बारकाईने आढावा घेतला आहे. यामध्ये संपूर्ण सरकारी दृष्टीकोनाचा अवलंब करून स्थानिक बाजारपेठ विकसित कऱण्याच्या प्रयत्नांचाही समावेश आहे. या अहवालात काही जागतिक अनुभवांची यादीही देण्यात आली आहे तसेच केंद्राच्या खरेदीच्या नवकल्पनांचा आढावा घेतला आहे. (AIR NEWS)

597 Days ago